कोकण तसेच मराठवाड्यात पारा घसरला !
By admin | Published: January 11, 2016 02:39 AM2016-01-11T02:39:11+5:302016-01-11T02:39:11+5:30
कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़ नाशिकमध्ये रविवारी सर्वात कमी किमान तापमान,
पुणे : कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़ नाशिकमध्ये रविवारी सर्वात कमी किमान तापमान, ९़६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे़ राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे़
विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ विदर्भात गुरुवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे १०़९, नगर १३़१, जळगाव १०़२, कोल्हापूर १५़८, महाबळेश्वर १४, मालेगाव १२़६, नाशिक ९़६, सांगली १४़१, सातारा १२, सोलापूर १६़१, मुंबई २०़२, अलिबाग १८़४, रत्नागिरी १८, औरंगाबाद १३़२, नांदेड १०, परभणी १४, अकोला १३़२, अमरावती १५़४, बुलढाणा१४़६, चंद्रपूर १६़२, गोंदिया १२़८, नागपूर ११़५, वर्धा १२़६, यवतमाळ १५़ (प्रतिनिधी)