कोकण मंडळ तिसऱ्या टप्प्यात उभारणार ७८६ घरे
By Admin | Published: November 8, 2015 12:30 AM2015-11-08T00:30:05+5:302015-11-08T00:30:05+5:30
म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत तिसऱ्या टप्प्यात बोळींज येथे ७८६ घरे उभारण्यात येणार असून या इमारतींच्या मंजूरीचा प्रस्ताव कोकण मंडळाने म्हाडा प्राधिकरणाकडे पाठविला आहे.
- २0१८ पर्यंत इमारतींचे काम पूर्ण होणार
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत तिसऱ्या टप्प्यात बोळींज येथे ७८६ घरे उभारण्यात येणार असून या इमारतींच्या मंजूरीचा प्रस्ताव कोकण मंडळाने म्हाडा प्राधिकरणाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव तातडीने मंजूर झाल्यास २0१८ पर्यंत येथील इमारतींचे काम पूर्ण होणार आहे. कोकण मंडळामार्फत विरार बोळींज येथे गृहप्रकल्प साकारण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात २0१४ मध्ये म्हाडाने १,७१६ घरांची लॉटरी काढली होती. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील इमारतींचे काम रखडल्याने २0१५ च्या सोडतीमध्ये विरार बोळींज येथील घरांचा समावेश नव्हता. म्हाडाने घोषित केल्याप्रमाणे नवीन वर्षामध्ये येथील ३ हजार ६४३ घरांची सोडत काढण्यात येणार आहे.