‘कोकण कन्या’ने 10 म्हशींना चिरडले
By admin | Published: September 7, 2014 03:00 AM2014-09-07T03:00:44+5:302014-09-07T03:00:44+5:30
गोव्याच्या दिशेने जाणा:या कोकण कन्या एक्स्प्रेसने साकेडी फाटकानजीक 10 म्हशींना चिरडले. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Next
दोन तास रखडली रेल्वे वाहतूक
कणकवली(जि़ सिंधुदुर्ग) : गोव्याच्या दिशेने जाणा:या कोकण कन्या एक्स्प्रेसने साकेडी फाटकानजीक 10 म्हशींना चिरडले. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे कोकण रेल्वे वाहतूक बराच काळ ठप्प होती़
ही एक्स्प्रेस साकेडी फाटय़ावर आल्यावर मोटरमनला समोर ट्रॅकवर चालणा:या म्हशी दिसल्या. त्याने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र वेग जास्त असल्याने दहाही म्हशींना ठोकर बसली. काही म्हशी रेल्वेखाली चिरडल्या, तर काही ठोकर बसून बाजूला उडाल्या. गाडीच्या इंजिन आणि डब्यांखाली म्हशी अडकल्या होत्या. म्हशींना बाहेर काढण्यात आले. साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोकणकन्या मार्गस्थ करण्यात आली.
गणोशोत्सवासाठी जिल्ह्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाले असताना अचानक शनिवारी सकाळी कोकणकन्याने दहा म्हशींना चिरडले. या अपघातामुळे सुमारे दोन तास कोकणकन्या रखडली होती. यामुळे कणकवली रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)