कोकण रेल्वे पूर्ण दिवस ‘ब्लॉक’
By admin | Published: May 15, 2014 03:05 AM2014-05-15T03:05:12+5:302014-05-15T04:22:20+5:30
मध्य रेल्वेने पेणजवळ काही कामांसाठी घेतलेल्या ब्लॉकची वेळ अचानक वाढवल्याने त्याचा मोठा फटका कोकण रेल्वेला बसला.
मंबई : मध्य रेल्वेने पेणजवळ काही कामांसाठी घेतलेल्या ब्लॉकची वेळ अचानक वाढवल्याने त्याचा मोठा फटका कोकण रेल्वेला बसला. कोकण रेल्वे मार्गावरुन सीएसटीच्या दिशेने येणार्या अनेक एक्सप्रेस गाड्यांना जागीच थांबवण्यात आल्या. तब्बल तीन ते चार तास एक्सप्रेस गाड्यांना थांबवण्यात आल्याने प्रवाशांकडून मात्र संताप व्यक्त करण्यात आल्या. काम वेळेत पूर्ण न झाल्यानेच हा फटका बसल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेने पेणच्या रेल्वे स्टेशन यार्डाचे आणि इंटर लॉकिंग कनेक्शनचे काम हाती घेतले आहे. ११ मे आणि १३ मे रोजी हे काम पूर्ण न झाल्याने १४ मे रोजीही दुपारी १२.४0 ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला. मात्र काम वेळेत पूर्ण न झाल्याने मध्य रेल्वेने चार वाजेपर्यंत असणारा ब्लॉक संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढवला. पाच वाजेपर्यंतही काम पूर्ण न झाल्याने अखेर रात्री सात वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेऊन काम करण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचाच मोठा फटका हळूहळू कोकण रेल्वे मार्गावरुन सीएसटीच्या दिशेने येणार्या एक्सप्रेस गाड्यांना बसला. ५0१0६ सावंतवाडी-दिवा ट्रेनला कोलाडजवळ तब्बल तीन तास थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर १0१0४ मांडवी एक्सप्रेसला कोलाडजवळच १ तास १0 मिनिटे आणि १२४४९ गोवा संपर्क क्रांति एक्स्प्रेसला माणगावजवळ दोन तास आणि पुन्हा कोलाडजवळ एक तास थांबवण्यात आले. तसेच १६३३६ हापा एक्सप्रेसला वीर स्थानकात दोन तास आणि 0१00४ हॉलिडे स्पेशल ट्रेनलाही संध्याकाळी कोलाडजवळच दोन तास थांबवण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.