कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार; प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:46 AM2019-11-01T01:46:04+5:302019-11-01T06:31:14+5:30

१ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक : पाऊस गेल्यामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

Konkan Railway trains will speed up; Signs of Comfort for Travelers | कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार; प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार; प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे

Next

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळी हंगामासाठी असलेले वेळापत्रक बदलल्याने आता गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पावसाळी वेळापत्रक बदलून आता १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. एक्स्प्रेस आपल्या नियमित वेगानुसार धावतील. त्यांचा वेग साधारण ताशी ९० ते ११० किमी. इतका असेल. नवीन वेळापत्रकानुसार गोवा तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील स्थानकांवरून मुंबईकडे जाणाºया गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. मात्र, मुंबईहून परतीच्या प्रवासाला निघणाºया या गाड्यांच्या वेळेत बदल होणार नाही.

नवीन वेळापत्रकाप्रमाणे मुंबईकडे जाणाºया गाड्यांच्या कणकवली स्थानकातील वेळा पुढीलप्रमाणे आहेत. मंगला एक्स्प्रेस पहाटे ५.४२ वाजता, दिवा पॅसेंजर सकाळी ९.२१ वाजता, मांडवी एक्स्प्रेस दुपारी ११.३३ वाजता, जनशताब्दी एक्स्प्रेस सायंकाळी ४.२८ वाजता, तुतारी एक्स्प्रेस सायंकाळी ७.४४ वाजता, कोकणकन्या एक्स्प्रेस रात्री ९.०८, मेंगलोर एक्स्प्रेस रात्री ८.४० वाजता, डबलडेकर (मंगळवार, गुरुवार) सकाळी ८.१० वाजता , ओखा एक्स्प्रेस (गुरुवार, शनिवार) दुपारी १.३८ वाजता, पुणे एक्स्प्रेस (मंगळवार, शुक्रवार) सायंकाळी ७.१० वाजता, वातानुकूलित करमळी एक्स्प्रेस (गुरुवारी) दुपारी ३.२० वाजता, तिरूनेलवेल्ली-दादर एक्स्प्रेस (गुरुवार) सकाळी ६.२८ वाजता, बिकानेर एक्स्प्रेस (रविवार) सकाळी ६.२९ वाजता, डबलडेकर (दर रविवारी) दुपारी ३ वाजता मुंबईकडे मार्गस्थ होईल.

‘कोकणकन्या’ ही सावंतवाडी स्थानकात मुंबईकडे जाण्यासाठी सायंकाळी ७.३६ वाजता, कुडाळ येथे रात्री ८.०९ वाजता, सिंधुदुर्गनगरी ८.२८ वाजता तर वैभववाडी येथे ९.३८ वाजता पोहोचेल. ‘तुतारी’ एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायंकाळी ६.५० वाजता सुटून कुडाळला ७.१० वाजता, सिंधुदुर्गनगरी येथे ७.३० वाजता पोहोचेल. ‘मांडवी’ एक्स्प्रेस ही सावंतवाडीला १०.४० वाजता, कुडाळला ११.०२ वाजता पोहोचेल.

‘नेत्रावती’ एक्स्प्रेस ही कुडाळला सकाळी ६.५० वाजता तर ‘तेजस’ एक्स्प्रेस कुडाळला ३.२८ वाजता येणार आहे. पावसाळी हंगामात सुरक्षिततेचा उपाय म्हणून गाड्यांचा वेग कमी करण्याबरोबरच गाड्यांच्या वेळेत बदल केला जातो. त्यामुळे गाड्यांना काहीसा विलंब होतो. आता पावसाळा संपत आल्याने वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

१० जून ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेस
मान्सून वेळापत्रकाप्रमाणे चालविल्या. आता कोकण रेल्वे मार्गावरील नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबर ते १० जून या कालावधीसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घेऊन नवीन वेळापत्रकाप्रमाणे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेच्या सूत्रांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Konkan Railway trains will speed up; Signs of Comfort for Travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.