कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडणार, वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेसेवा लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 01:39 PM2018-08-01T13:39:10+5:302018-08-01T15:04:42+5:30
मुंबईतून कोकण रेल्वेमार्गे कोल्हापूरला जाणे आता शक्य होणार आहे. कोकण रेल्वे मार्ग आता पश्चिम रेल्वेशी जोडण्यात येणार आहे.
नवी दिल्ली - मुंबईतून कोकण रेल्वेमार्गे कोल्हापूरला जाणे आता लवकरच शक्य होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी येथून कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरू होणार असून, बऱ्याच वर्षांपासून नियोजित असलेल्या या रेल्वे मार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. कोकण रेल्वेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 103 किमी असेल. तसेच या मार्गावर एकूण 10 स्थानके असतील. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाणारा हा मार्ग प्रत्यक्षात उतरल्यावर कोकणातून कोल्हापूरला जाणे अधिकच सोपे होणार आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
Reviewed the work plans for the construction of the 103 km. Kolhapur-Vaibhavwadi section of Konkan Railway, which will begin very soon. The project will be a major game changer for the overall economy of Maharashtra linking the coastal region with Western Maharashtra. (1/3) pic.twitter.com/Kq2aimcO4o
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 1, 2018
"कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरच सुरु होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आयोजित कोकण रेल्वे आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . या बैठकीला रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 103 किलोमीटर लांबीचा हा मार्ग कोकण रेल्वेबरोबरच या क्षेत्राच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरेल," असे प्रभू यांनी यावेळी सांगितले.
The construction of the Kolhapur-Vaibhavwadi line will facilitate the development of ports and harbours in the coastal region of Maharashtra and allow the flow of goods from the hinterland to the coast. (2/3)
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 1, 2018
Read more- https://t.co/18Eyts0Da0
कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी 50 टक्के खर्च भारतीय रेल्वे करणार असून उर्वरित50 टक्के खर्च महाराष्ट्र राज्य शासन करणार आहे.
The Kolhapur-Vaibhavwadi project will also accelerate the movement of petroleum from the refinery to the coast from the world’s largest integrated refinery cum petrochemicals complexes being built near Vaibhavwadi in Ratnagiri district, in the Konkan region of Maharashtra. (3/3)
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 1, 2018
रत्नागिरी जिल्ह्यात वैभववाडीजवळ इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल आणि एचपीसीएलमार्फत 40 अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून महा तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. 2022 सालापर्यंत तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गावर कोकण रेल्वे धावू लागल्यानंतर या प्रकल्पालाही त्याचा लाभ होणार आहे.