विद्युतीकरण पूर्ण; कोकण रेल्वेवर आता नाही ‘धुरांच्या रेषा’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 09:35 AM2022-09-12T09:35:35+5:302022-09-12T09:35:50+5:30

गुरुवारपासून गाड्यांना विजेचे इंजिन, या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत.

Konkan Railway will run on electricity from September 15 | विद्युतीकरण पूर्ण; कोकण रेल्वेवर आता नाही ‘धुरांच्या रेषा’

विद्युतीकरण पूर्ण; कोकण रेल्वेवर आता नाही ‘धुरांच्या रेषा’

googlenewsNext

मुंबई : भारतीय रेल्वेमार्गांवरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम केले असून, देशातील सर्वांत मोठे रेल्वेचे विद्युतीकरण कोकण रेल्वेमार्गावर केले आहे. चाकरमान्यांच्या हक्काची असलेली कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. 
येत्या गुरुवारपासून कोकणात जाणाऱ्या  दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस आणि दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस पूर्णपणे विद्युत इंजिनावर चालविण्यात येणार आहेत.  कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ९७० कि.मी. लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाले आहे. 

या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते रोह्यापर्यत विद्युतीकरण असल्याने विद्युत्प्रवाहावरील इंजिने मेल, एक्स्प्रेस गाड्यांना चालविण्यात येत होती. रोहा स्थानकांपुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेल इंजिन जोडून गाड्या मार्गस्थ कराव्या लागत होत्या; मात्र, आता विद्युतीकरण पूर्ण झाल्याने टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या विद्युत इंजिनावर धावणार आहेत. 

कधी लागणार विद्युत इंजिन? 
आता टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्याचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस, २० सप्टेंबर रोजी मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, १५ ऑक्टोबर रोजी  जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस,  १ जानेवारी २०२३ रोजी  मुंबई-मेंगलोर एक्स्प्रेस या गाड्यांना विद्युत इंजिन लागणार आहे. 

मुंबई-कोकण मार्गावर अप-डाऊन एकूण गाड्या २० 
देशातून एकूण ३७ रेल्वेगाड्यांची वाहतूक
रेल्वेच्या विद्युतीकरणाला २०१६ रोजी रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
रत्नागिरी ते थिविम या दरम्यान विद्युतीकरण    
९७० कि.मी. लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण 
विद्युतीकरणासाठी एकूण १२८७ कोटीं रुपयांचा खर्च 

इंधनाची होणार बचत
 १२ डब्यांच्या रेल्वेगाडीच्या एका किलोमीटरसाठी साधारणपणे ६ ते १० लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनच्या अश्वशक्तीनुसार यात बदल होतो. विजेवर प्रवासी रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिझेलची बचत होईल. इंधनावरही वर्षाला साधारणत १५० ते २०० कोटी रुपये खर्च होतो. विद्युतीकरणामुळे  प्रवाशांना प्रदूषणमुक्त वातावरणात रेल्वे प्रवास शक्य होणार आहे.

Web Title: Konkan Railway will run on electricity from September 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.