कोकण रेल्वेचा दुहेरी मार्ग अखेर ‘ट्रॅकवर’

By admin | Published: July 20, 2015 01:30 AM2015-07-20T01:30:34+5:302015-07-20T01:30:34+5:30

: दुहेरी मार्ग नसल्याने कोकण रेल्वेला आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. हे पाहता कोकण रेल्वेवरील दुहेरी मार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे

Konkan Railway's double route finally gets tracked | कोकण रेल्वेचा दुहेरी मार्ग अखेर ‘ट्रॅकवर’

कोकण रेल्वेचा दुहेरी मार्ग अखेर ‘ट्रॅकवर’

Next

मुंबई : दुहेरी मार्ग नसल्याने कोकण रेल्वेला आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. हे पाहता कोकण रेल्वेवरील दुहेरी मार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आम्हाला याबाबतचे मंजुरीचे पत्र अद्याप मिळणे बाकी असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भानु प्रकाश तायल यांनी सांगितले.
एकच रेल्वे मार्ग उपलब्ध असल्याने कोकण रेल्वे मार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होते. यात काही वेळा तर कोकण रेल्वे पुर्ववत होण्यास एक दिवसही लागतो. जर एखादा दुसरा मार्ग उपलब्ध असल्यास कोकण रेल्वेवरील सेवा ही थोडी का असेना पण पुर्ववत राहू शकते. त्यासाठी कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. ही मागणी पाहता कोकण रेल्वेकडून दुहेरीकणाचा प्रस्तावही मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाला मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळून दुहेरीकरण होणार तरी कधी असा प्रश्न कोकण रेल्वेबरोबरच प्रवाशांनाही पडला होता.
अखेर या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भानु प्रकाश तायल यांना विचारले असता, दुहेरीकरणाच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. पंरतु अजून या मंजुरीचे पत्र आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे दुहेरीकरण कसे आणि कोणत्या टप्प्यात आहे, ही बाब स्पष्ट झालेली नाही. पत्र आले की सर्व बाबी स्पष्ट होतील. त्यामुळे दुहेरीकरणाचा तिढा सुटलेला आहे.

Web Title: Konkan Railway's double route finally gets tracked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.