कोकणवासीयांना फटका !
By admin | Published: June 30, 2014 01:38 AM2014-06-30T01:38:59+5:302014-06-30T01:38:59+5:30
एक विशिष्ट बुकिंग सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांत कोकण रेल्वे हाऊसफुल झाल्याने फटका गणोशोत्सवाला कोकणात जाणा:या मुंबईच्या चाकरमान्यांना बसला आहे.
Next
>मुंबई : गणोशोत्सवासाठी बुकिंग सुरू होताच दलालांच्या एक विशिष्ट बुकिंग सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांत कोकण रेल्वे हाऊसफुल झाल्याने फटका गणोशोत्सवाला कोकणात जाणा:या मुंबईच्या चाकरमान्यांना बसला आहे. शनिवारी तिकीट आरक्षणाच्या रांगेतील पहिल्या क्रमांकाच्या गणोशभक्ताला 3क्क् हून अधिक वेटिंग लिस्ट असलेले तिकीट मिळाले. परिणामी लांबच लांब रांगा लावलेल्या कोकणवासीयांच्या पदरी निराशा पडली.
मुंबईतला चाकरमानी गणोशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतो. यासाठी एसटी, खासगी ट्रॅव्हल्ससह कोकण रेल्वेकडे चाकरमानी धाव घेत असतो. मात्र रेल्वेतील दलालांचे रॅकेट एवढे फोफावले आहे की, त्यामुळे बुकिंग सुरू झाल्यानंतर कोकणवासीयांना वेटिंग लिस्टवर राहावे लागते. शनिवारीही कोकण रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी लाखो चाकरमान्यांनी तिकीट खिडक्यांवर रांगा लावल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात जेव्हा बुकिंग सुरू झाले तेव्हा मात्र पहिल्या क्रमांकाच्या गणोशभक्ताला तब्बल 3क्क् हून अधिक वेटिंग लिस्ट असलेले तिकीट मिळाले. परिणामी तिकिटासाठी खिडक्यांवर लांबच लांब रांगा लावलेल्या कोकणवासीयांच्या पदरी निराशा पडली. (प्रतिनिधी)
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. शिवाय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे तक्रारही केली आहे.
तावडे यांनी गौडा यांना दिलेल्या पत्रनुसार, रेल्वे तिकीट दलालांच्या रॅकेटमुळे ही तिकिटे संपली आहेत. दलालांकडे असलेले एक विशिष्ट सॉफ्टवेअर ते ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वी वापरतात.
त्यामुळे सर्वसमान्यांना तिकीट मिळत नाही. हा प्रकार गंभीर आहे. यासंदर्भात तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार त्यांनी केली आहे.