कोकणच्या गाड्यांना लेट मार्क ?
By admin | Published: January 8, 2015 01:50 AM2015-01-08T01:50:38+5:302015-01-08T01:50:38+5:30
मध्य रेल्वेकडून ९ जानेवारी रोजी पेण ते कासू, कासू ते नागोठणे आणि नागोठणे ते रोहा दरम्यान दुहेरीकरणाच्या अभियांत्रिकी कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेकडून ९ जानेवारी रोजी पेण ते कासू, कासू ते नागोठणे आणि नागोठणे ते रोहा दरम्यान दुहेरीकरणाच्या अभियांत्रिकी कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.५0 ते सायंकाळी १६.२0 पर्यंत असणाऱ्या ब्लॉकमुळे कोकणमार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठा लेटमार्क लागण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
काही ट्रेनचा शेवटचा थांबा बदलण्यात आला आहे. ट्रेन नंबर ७१0८९ दिवा-रोहा डिझेल ट्रेन ही दिवावरुन सकाळी ९.१0 वाजता सुटेल. मात्र ती पेणपर्यंतच धावेल. तर ट्रेन नंबर ७१0९६ रोहा-दिवा ट्रेनही सायंकाळी १६.२४ वाजता पेणहून सोडण्यात येईल. या दोन्ही ट्रेन रोहा ते पेण दरम्यान रद्द करण्यात
आल्या आहेत.
या दिवशी धावणारी ट्रेन नंबर १६३४५ एलटीटी ते थिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ११.४0 च्या ऐवजी दुपारी १४.२0 वाजता सुटेल.
ट्रेन नंबर १0१११ सीएसटी ते मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस १0 जानेवारी रोजी रात्री २३.0५ वाजण्याच्या ऐवजी 00.२0 वाजता सुटेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
डाऊन ट्रेन : ट्रेन नंबर १९२६२ पोरबंदर ते कोच्चुवेल्ली एक्सप्रेस, १२६१९ एलटीटी ते मेंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस, ५0१0३ दादर ते रत्नागिरी पॅसेंजर, १२२0१ एलटीटी ते कोच्चुवेल्ली गरीब रथ एक्सप्रेस ब्लॉकवेळी जीते आणि पेण दरम्यान नेहमीप्रमाणे धावेल. रोहापासून ४५ मिनिट ते चार तास उशिराने धावतील.
अप ट्रेन : ट्रेन नंबर १६३४६ थिरुवनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस, १२४३१ थिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीम राजधानी एक्सप्रेस, ५0१0६ सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, १0१0४ मडगाव-सीएसटी मांडवी एक्सप्रेस, २२९0७ मडगाव-हापा एक्सप्रेस, १२२५९ कोच्चुवेल्ली-भावनगर एक्सप्रेस, १२0५२ करमाळी -दादर टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेन रोहापर्यंत सुरळीत धावतील. त्यानंतर या ट्रेनला ४0 मिनिटे ते साडे तीन तासांचा लेटमार्क लागू शकतो.