दोन दिवस कोकण आणखी तापणार, मुंबईसह बहुतांशी शहरांचे तापमान ३५ अंश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 06:22 AM2024-03-26T06:22:35+5:302024-03-26T06:55:04+5:30
आता मुंबईत आर्द्रता ४५ टक्के नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी आहे.
मुंबई : मार्च महिन्याचा उत्तरार्ध तापू लागला असून, मुंबईसह लगतच्या बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ अंशावर जाऊन ठेपले आहे. ठाणे, नवी मुंबईही ३६ ते ३८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, यात भर म्हणून पुढील दोन दिवस कोकण आणखी तापणार आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होईल. २६ ते २७ मार्च दरम्यान कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील.
आता मुंबईत आर्द्रता ४५ टक्के नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईची आर्द्रता ७५ टक्क्यांची आसपास नोंदविण्यात येईल. यावेळी तापमान ३४ असले तरी ३८ जाणवेल.
सोमवारी नोंदविलेले कमाल तापमान
मुंबई ३३.६
पुणे ३८.९
नांदेड ३९.४
नाशिक ३७.७
परभणी ४०
कोल्हापूर ३७.७
सांगली ३८.७
सोलापूर ४०
छत्रपती संभाजी नगर ३८.२
बारामती ३८
सातारा ३८.४