Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:28 AM2022-09-20T10:28:04+5:302022-09-20T10:48:17+5:30

Konkan Railway, Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे.

Konkankanya Express becomes the 'Superfast', big change in train number and schedule | Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल

Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल

googlenewsNext

मुंबई - कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या ट्रेन्सपैकी मुंबई-मडगावदरम्यान धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस ही चाकरमानी आणि कोकणी प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. रात्रीच्या वेळी निघणारी ही गाडी आरामदायक प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसचं आरक्षण नेहमीच फुल्ल असतं. दरम्यान, कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट श्रेणीत समावेश केलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्ये आणि क्रमांकामध्ये झालेल्या बदलाची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार २० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्स्प्रेस ही सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. सुपरफास्ट श्रेणीत समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसचा क्रमांक बदलला असून, कोकणी प्रवाशांना तोंडपाठ असलेल्या १०१११ आणि १०११२ या प्रचलित क्रमांकाऐवजी २०१११ आणि २०११२ या क्रमांकांसह धावणार आहे.

सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्येही बदल झाला आहे. मुंबईवरून मडगावसाठी निघणारी २०१११ ही कोकणकन्या एक्स्प्रेस सीएएसएमटी स्थानकातून रात्री ११.०५ वाजता निघेल. त्यानंतर ही गाडी दादर (११.१७), ठाणे (११.४५), पनवेल (१२.२५), खेड (३.०४), चिपळूण (३.३०), संगमेश्वर (४.०२), रत्नागिरी (४.४५), राजापूर (५.५०), वैभववाडी (६.१०), कणकवली (६.४२), सिंधुदुर्ग (७.००), कुडाळ (७.१२), सावंतवाडी (०७.३२), पेडणे (७.५६) आणि मडगाव (९.४६) येथे पोहोचेल.

तर मडगावहून मुंबईकडे निघणारी २०११२ ही गाडी मडगावहून संध्याकाळी ७.०० वाजता निघेल. ही गाडी सावंतवाडी ( रात्री ८.३६), कुडाळ (रात्री ९.००), सिंधुदुर्ग (रात्री ९.१२), कणकवली (रात्री ९.२८), वैभववाडी ( रात्री ९.५६), राजापूर (रात्री २२.१४), रत्नागिरी (रात्री २३.१५), चिपळूण (रात्री १२.२८), खेड (रात्री १२.५५), पनवेल ( पहाटे ३.५५), ठाणे (पहाटे ४.४२), दादर (पहाटे ५.१२), मुंबई सीएसएमटी (पहाटे ५.४०) वाजता पोहोचेल.

सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे


Web Title: Konkankanya Express becomes the 'Superfast', big change in train number and schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.