कोपर्डी प्रकरणात अ‍ॅड. उज्ज्वल निकमांची साक्ष नोंदवा, बचाव पक्षाची मागणी

By admin | Published: June 22, 2017 11:34 PM2017-06-22T23:34:48+5:302017-06-22T23:34:48+5:30

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून खटल्यात बचाव पक्षानं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली

In the Kopardi case, Adv. Report the testimony of Ujjwal Nikam, the defense party's demand | कोपर्डी प्रकरणात अ‍ॅड. उज्ज्वल निकमांची साक्ष नोंदवा, बचाव पक्षाची मागणी

कोपर्डी प्रकरणात अ‍ॅड. उज्ज्वल निकमांची साक्ष नोंदवा, बचाव पक्षाची मागणी

Next

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 22 - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून खटल्यात बचाव पक्षानं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे. बचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी कोर्टात साक्षीदारांची एक यादी दिली. विशेष म्हणजे या यादीत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचंही नाव होतं.

कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तपासावर बचाव पक्षाला आक्षेप होता. खटला उभा राहिल्यानंतर सरकारी वकील काम सुरू करतात. मात्र खटल्यात सरकारी वकिलांनी काम सुरू केलं नसल्याचा दावा बाळासाहेब खोपडे यांनी केला आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय. विशेष म्हणजे भारतीय न्यायदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सरकारी वकिलांची साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तर  कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांची न्यायालात चार तास मॅरेथॉन चौकशी झाली़ असून, सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 26 साक्षीदारांची तपासणी झाली आहे. अजून तीन जणांच्या साक्षी नोंदविल्या जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आता अॅड. उज्ज्वल निकम यांचीच साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. 

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असून, सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक गवारे यांची साक्ष घेतली़, गवारे यांनी अत्याचार आणि खुनाशी संबंधित तक्रार व तपासाची माहिती दिली आहे.

कोपर्डी घटनेतील आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे याला 15 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या जबाबानंतर या घटनेत संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही दोन दिवसांच्या अंतराने अटक करण्यात आली़ होती. शिंदे याच्या घराची झडती घेतली होती, तेव्हा तेथे मोबाईल व काही अश्लील सीडी आढळून आल्या होत्या. 

Web Title: In the Kopardi case, Adv. Report the testimony of Ujjwal Nikam, the defense party's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.