कोपर्डी प्रकरणात बचाव पक्षाला हवी मुख्यमंत्र्यांची साक्ष
By admin | Published: June 23, 2017 02:12 PM2017-06-23T14:12:41+5:302017-06-23T14:27:09+5:30
कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश आहे
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 23 - कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश आहे. बचाव पक्षाला ज्यांची साक्ष काढायची आहे, अशांची यादी दिली असून त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचंही नाव आहे. अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी नितीन भैलूमेचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश करवा, अशा मागणीचा अर्ज दिला आहे.
आरोपीचे वकील प्रकाश अहेर यांच्याकडून न्यायालयात अर्ज सादर
विधानसभेत आणि एका वृत्तवाहिन्याच्या मुलाखतीत आरोपीला फाशी देणार असल्याचं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा साक्षीदारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून खटल्यात बचाव पक्षानं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे. बचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी कोर्टात साक्षीदारांची एक यादी दिली. विशेष म्हणजे या यादीत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचंही नाव होतं.
कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तपासावर बचाव पक्षाला आक्षेप होता. खटला उभा राहिल्यानंतर सरकारी वकील काम सुरू करतात. मात्र खटल्यात सरकारी वकिलांनी काम सुरू केलं नसल्याचा दावा बाळासाहेब खोपडे यांनी केला आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
विशेष म्हणजे भारतीय न्यायदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सरकारी वकिलांची साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तर कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांची न्यायालात चार तास मॅरेथॉन चौकशी झाली़ असून, सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 26
साक्षीदारांची
तपासणी झाली आहे.
अजून तीन जणांच्या साक्षी नोंदविल्या जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काही
दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आता अॅड. उज्ज्वल निकम यांचीच साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आल्यानं खळबळ उडाली
आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असून, सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक गवारे यांची साक्ष घेतली़, गवारे यांनी अत्याचार आणि खुनाशी संबंधित तक्रार व तपासाची माहिती दिली आहे.
कोपर्डी घटनेतील आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे याला 15 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या जबाबानंतर या घटनेत संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही दोन दिवसांच्या अंतराने अटक करण्यात आली़ होती. शिंदे याच्या घराची झडती घेतली होती, तेव्हा तेथे मोबाइल व काही अश्लील सीडी आढळून आल्या होत्या.