कोपर्डी प्रकरण : वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद

By Admin | Published: July 21, 2016 03:01 PM2016-07-21T15:01:39+5:302016-07-21T15:01:39+5:30

कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या केल्याच्या घटनेच्या निषधार्थ मराठा व बहुजन समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

Kopardi Case: The Vilazha Mahanagar Bandla euphemistically responded | कोपर्डी प्रकरण : वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद

कोपर्डी प्रकरण : वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत
औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या केल्याच्या घटनेच्या निषधार्थ मराठा व बहुजन समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. बजाजनगर, सिडको, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेणपूंजी, पंढरपूर, वाळूज या भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी रुग्णालय, मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता शाळा-महाविद्यालयासह संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नेहमी गर्दीने फुलेल्या मुख्य चौक, रस्त्यावर शुकशुकाट होता.

अहमदनगर जिल्यातील कोपर्डी गावात चार नराधमानी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या केली. संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा राज्यभर निषेध करण्यात करुन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली गेली. या क्रुर घटनेच्या निषेधार्थ मराठा व बहुजन समाजातर्फे गुरुवार २१ रोजी वाळूज महानगर बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या बंदला गुरुवारी वाळूज परिसरातील शाळा-महाविद्यालय, व्यापारी, व्यवसायिक यांनी आपले सर्व कामकाज बंद ठेवून उत्सफु र्त प्रतिसाद दिला.

बजाजनगर, सिडको, रांजणगाव शेणपूंजी, पंढरपूर, वाळूज या भागात तर सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. तर जोगेश्वरी, तीसगाव, साजापूर, आदि भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

सकाळी ८ वाजता नितिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगर, सिडको, पंढरपूर, रांजणगाव शेणपूजी, वडगाव कोल्हाटी भागात वाहन रॅली काढून सर्वाना बंदचे आवाहन करण्यात आले.
 

Web Title: Kopardi Case: The Vilazha Mahanagar Bandla euphemistically responded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.