Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 10:23 IST2024-11-23T09:44:17+5:302024-11-23T10:23:32+5:30
Kopri-Pachpakhadi Assembly Election 2024 Result Live Updates: आज मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली असून पोस्टल मतमोजणीत पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे.

Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
Kopri-Pachpakhadi Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्यात विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघाकडे. यावेळी या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते केदार दिघे असा सामना रंगला आहे. त्यामुळे येथे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विजय मिळवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आज मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली असून पोस्टल मतमोजणीत पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी मतदारसंघात पहिल्या कलांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. तर केदार दिघे पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत एकनाथ शिंदे ४०५१ मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 :
शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात होती. त्यामुळे ठाकरे गटाने कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून तिनदा निवडून आले असून ते यंदाही याच मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे येथे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विजय मिळवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.