‘समृद्धी’साठी ३५ हजार कोटी कर्ज देण्यास कोरियाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:19 AM2017-10-05T05:19:58+5:302017-10-05T05:20:23+5:30
राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दक्षिण कोरियाच्या दौ-यावर गेले होते.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दक्षिण कोरियाच्या दौ-यावर गेले होते. तेथील सरकारने ‘समृद्धी’साठी ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती गगराणी यांनी दिली.
प्रकल्पात पारदर्शकता असावी यासाठी भूसंपादनाची सर्व माहिती एमएसआरडीसीच्या वेबसाईटवर दिलेली आहे. कोरिया सरकारचे अर्थसहाय्य घेताना तेथील एखाद्या कंपनीला ‘समृद्धी’चे कंत्राट घेताना इतरांप्रमाणे संपूर्ण प्रक्रियेतूनच जावे लागेल. ज्या कंपन्यांचा पूर्वेतिहास असमाधानकारक आहे, त्यांना निविदा प्रक्रियेतून वगळले जाईल, असे एकनाथ शिंदे आणि भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता अनिलकुमार गायकवाड आणि सहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) पी. एस. मंडपहेही यावेळी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गावर पाच ठिकाणी विमान धावपट्टया उभारण्याचा प्रस्ताव आता बारगळला आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी सांगितले की, नागरी हवाई वाहतूक विभागाने ते व्यवहार्य ठरणार नाही, असे आम्हाला सांगितले आहे.
युद्धकाळात अशा धावपट्टया उपयुक्त ठरतात. तथापि, आम्हाला अशा धावपट्टयांची गरज नसल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाºयांनी स्पष्टपणे कळविल्यानंतर आता प्रस्ताव बारगळला आहे.