कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:26 AM2018-09-26T06:26:55+5:302018-09-26T06:27:28+5:30

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले.

 Koregaon Bhima Violence: Prakash Ambedkar had given the call of 'Bandh' | कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक

कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक

Next

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले. मिलिंद एकबोटे यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली का? आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे बघून त्यांनीच बंद मागे घेण्याचा   आदेश दिला का, असे प्रश्न प्रधान  यांनी साक्षीदाराला केले. त्यावर साक्षीदाराने होकारार्थी उत्तर दिले.
तसेच पुण्यात ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर होते आणि त्यांनीच दुसºया दिवशी म्हणजे १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते का, या प्रश्नावर उत्तर देताना साक्षीदाराने आपण हे सर्व वर्तमानपत्रात वाचल्याचे आयोगाला सांगितले.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने, या साक्षीदाराने व त्यांच्या मंडळाच्या सहकाºयांनी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी
एक बस भरून माणसे नेली होती. मात्र, विजयस्तंभापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तेथे हिंसाचार सुरू झाल्याने, त्या सर्वांना जीव वाचवत परतावे लागले. त्यांच्या बसला आगही लावण्यात आली. कोरेगाव भीमा घटनेनंतर २ जानेवारीला ठाणे येथील श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेलो असता, पोलिसांनी तक्रार नोंदविण्यात टाळाटाळ केली आणि आम्हालाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, असे या साक्षीदाराने सांगितले. त्यानंतर, आम्ही काही लोकांना
फोन करून पोलीस ठाण्यात बोलाविले. मात्र, त्या लोकांबरोबर मोठा जमाव आला. पोलीस तक्रार घेत नसल्याने जमावातील काही लोकांनी संबंधित परिसरातील आजूबाजूची दुकाने जबरदस्तीने बंद केली, अशीही माहिती या साक्षीदाराने आयोगाला दिली. राज्य सरकारही या साक्षीदाराची उलटतपासणी घेणार आहे.

मुदतवाढीसाठी सरकारला अर्ज
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त
केलेल्या आयोगाची मुदत ५ आॅक्टोबरला संपत आहे. मात्र, अद्याप
मुंबईतील काही साक्षीदारांची व पुण्यातील साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे
काम पूर्ण झालेले नाही. त्यासाठी आणखी किती काळ लागेल, हे सांगता
येत नाही. याबाबत आयोगाला मुदतवाढ देण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच
अर्ज केला असून, राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा असल्याचे
आयोगाच्या सचिवांनी सांगितले.

Web Title:  Koregaon Bhima Violence: Prakash Ambedkar had given the call of 'Bandh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.