कोरेगाव भीमा प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी नि:पक्षपाती कारवाई करावी - आंबेडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:47 AM2018-01-29T04:47:42+5:302018-01-29T04:48:08+5:30

कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारीनगर येथे दिला़

 Koregaon Bima Case: Chief Minister should take non-discriminatory action - Ambedkar | कोरेगाव भीमा प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी नि:पक्षपाती कारवाई करावी - आंबेडकर  

कोरेगाव भीमा प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी नि:पक्षपाती कारवाई करावी - आंबेडकर  

googlenewsNext

अहमदनगर - कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारीनगर येथे दिला़
पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्यापुरते हे प्रकरण मर्यादित नाही़ जी भिडेंची प्रवृत्ती आहे़, तीच प्रवृत्ती करणीसेनेची आहे़ संभाजी भिडे यांना पंतप्रधानच पाठिशी घालत आहेत, असा आपला सुरुवातीपासूनचा आरोप आहे़ या दोघांच्या संबंधाचे भक्कम पुरावे आपल्याकडे आहेत़, असे सांगून जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील़, असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल प्रतिगामीकडे सुरू आहे़
राज्यातील अनियंत्रित हिंदू संघटना बेफाम झाल्या आहेत़ अनियंत्रित व नियंत्रित हिंदू संघटनांमध्ये भांडण सुरू झाले असून, त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे़. या भांडणाची झळ मुस्लीम, ख्रिश्चन आणि दलितांना बसत नसून, मध्यमवर्गीय सवर्ण हिंदूंनाच बसत आहे़
हिंदू संघटनांतील हे भांडण सवर्ण हिंदूंच्या दारात येऊन पोहोचले आहे़ वादाचे उत्तर कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही़ ते सवर्ण हिंदंूकडेच आहे़ त्यांनीच काय ते ठरावावे, असे आवाहन आंबेडकर यांनी या वेळी केले़

शरद पवारांनी राजकीय चारित्र्य तपासावे

राष्ट्रीय राजकारणात राजकीय चारित्र्यवान व्यक्ती एकत्र येत असतात़ समविचारी पक्षांना एकीची हाक देणाºयांनी स्वत:चे राजकीय चारित्र्य तपासण्याची गरज आहे़ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ही भाजपासोबत जाण्यास तयार नव्हती़ तेव्हा सर्वप्रथम राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला होता, ही बाब विसरून चालणार नाही़ संविधान बचाव रॅलीसाठी
पवार यांच्यासोबत जाणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना पवार यांचे नाव न घेता, प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली़

Web Title:  Koregaon Bima Case: Chief Minister should take non-discriminatory action - Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.