कृष्णाकाठी मराठा महासागर
By admin | Published: September 28, 2016 12:36 AM2016-09-28T00:36:49+5:302016-09-28T00:36:49+5:30
कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटलेल्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचे मंगळवारी सांगलीत विराट
नाशिकरोड : नाशिक जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन व लोकसंकल्प केमिस्ट ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसी डे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष गोरख चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उपेंद्र दिवानी, व्यापारी बॅँकेचे उपाध्यक्ष अशोक चोरडिया, संचालक हेमंत गायकवाड, सुनील आडके, नाशिकरोडचे दुय्यम पोलीस निरीक्षक हनुमंता गाडेकर, महेंद्र शहा आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा करणाऱ्या ३० औषध विक्रेत्यांचा व नवीन फार्मसी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फार्मसीविषयी उपयुक्त माहितीच्या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गोरख चौधरी, उपेंद्र दिवानी आदिंनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक महेंद्र शहा यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी हांडोरे व आभार अमित कवडे यांनी मानले. यावेळी देवीदास उदावंत, मंगेश पगार, महेंद्र शिरूडे, अरुण माळवे, विनायक पावगी, संजय चकोर, संजय बागुल, प्रवीण शिरूडे, झुंझार दानावाला, अतुल दिवटे, उमेश चोपडा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)