कुकडी कालवा अहमदनगर जिल्ह्यात फुटला

By admin | Published: April 21, 2016 02:34 PM2016-04-21T14:34:09+5:302016-04-21T15:11:48+5:30

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याकडे पाणी वाहून नेणारा कुकडी कालवा अहमदनगर जिल्ह्यात फुटला. त्यामुळे या कालव्यातील पाणी बंद करुन ते श्रीगोंदा तालुक्यात वळविण्यात आले.

Kukadi canal splintered in Ahmednagar district | कुकडी कालवा अहमदनगर जिल्ह्यात फुटला

कुकडी कालवा अहमदनगर जिल्ह्यात फुटला

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 21 - सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याकडे पाणी वाहून नेणारा कुकडी कालवा अहमदनगर जिल्ह्यात नांदगावजवळ फुटला. त्यामुळे या कालव्यातील पाणी बंद करुन ते श्रीगोंदा तालुक्यात वळविण्यात आले आहे. 
पुणो जिल्ह्यातील येडगाव धरणातून पिण्यासाठी कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी 194 किलोमीटरवर असलेल्या चौंडी (ता. जामखेड, जि. नगर) पर्यंत नेले जाणार होते. मात्र, तत्पूर्वी 181 किलोमीटर अंतरावर हा कालवा फुटला आहे. त्यामुळे भोसेखिंड बोगद्यातून कालव्याचे पाणी सीना धरणात वळविण्यात आले आहे.
 
 
कालवा दुरुस्त झाल्यानंतर आवर्तन पुन्हा सुरळीत होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Web Title: Kukadi canal splintered in Ahmednagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.