कुंभमध्ये सेनेचा स्वतंत्र आखाडा!

By admin | Published: July 15, 2015 02:48 AM2015-07-15T02:48:52+5:302015-07-15T02:48:52+5:30

सत्तेत राहून विरोधकाची भूमिका वठविणाऱ्या शिवसेनेने सिंहस्थ कुंभपर्वातही आपली वेगळी चूल मांडली आहे. साधुग्राममध्ये खासगी जागा घेऊन सेनेच्या एका माजी आमदाराने

Kumbh army army's independent akhada! | कुंभमध्ये सेनेचा स्वतंत्र आखाडा!

कुंभमध्ये सेनेचा स्वतंत्र आखाडा!

Next

नाशिक : सत्तेत राहून विरोधकाची भूमिका वठविणाऱ्या शिवसेनेने सिंहस्थ कुंभपर्वातही आपली वेगळी चूल मांडली आहे. साधुग्राममध्ये खासगी जागा घेऊन सेनेच्या एका माजी आमदाराने आपल्या धार्मिक गुरूचा स्वतंत्र आखाडा काढला आहे. विशेष म्हणजे सिंहस्थ कुंभपर्वाचे धर्मध्वजारोहण मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत असताना, दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आखाड्यातील अखंड धर्मज्योत प्रज्वलित करून इथेही आपला सवतासुभा मांडला!
सिंहस्थ सोहळ्याची सर्व सूत्रे भाजपाच्या हाती आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन हे जातीने सर्व व्यवस्था पाहत आहेत. शिवाय, महापालिका मनसेच्या ताब्यात असल्याने पर्वाच्या नियोजनापासून ते विविध कार्यक्रमांच्या आयोजनापर्यंत मनसैनिक घरचे कार्य समजून उत्सवात हिरिरीने सहभागी होत आहेत. या सगळ्या उत्सवात शिवसेना बाजूला पडू नये म्हणून शिवसेनेचे माजी आमदार बबन घोलप यांनी आपलाही एक तंबू ठोकला आहे.
धार्मिक गुरू हिमालयबाबा यांच्यासाठी तपोवनातील मोक्याची खासगी जागा अधिग्रहित करून त्यावर भव्य आखाडा उभा केला आहे. सिंंहस्थपर्वात या आखाड्यात होम-हवन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पर्वाच्या पहिल्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाचारण करून त्यांच्या हस्ते आखाड्यात धर्मज्योत प्रज्वलित करण्यात आली. या वेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणाही देण्यात आल्या! (प्रतिनिधी)

सेनेचे मंत्री नाराज..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेला आमदारांच्या बैठकीत मंगळवारी एकमुखी पाठिंबा देण्यात आला असला तरी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. मागील सरकारमधील कर्जमाफी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील बँकांच्या पथ्यावर पडणारी होती. त्यामुळे भाजपाची कोंडी करताना राष्ट्रवादीला फायदा होणारी भूमिका सेनेने घेऊ नये, असे सेनेच्या दोन मंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी खासगीत बोलताना सांगितले.

सिंहस्थासाठी कायमस्वरूपी जागा
नाशिक : कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करून, जागा मालकांना त्याचा योग्य मोबदलाही देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Web Title: Kumbh army army's independent akhada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.