कुरकुंभला गटारामुळे दुर्गंधी

By admin | Published: May 20, 2016 02:15 AM2016-05-20T02:15:02+5:302016-05-20T02:15:02+5:30

येथील मुख्य चौकात असणाऱ्या सांडपाण्याचे गटार तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे.

Kurakumbala gutter causes bad luck | कुरकुंभला गटारामुळे दुर्गंधी

कुरकुंभला गटारामुळे दुर्गंधी

Next


कुरकुंभ : येथील मुख्य चौकात असणाऱ्या सांडपाण्याचे गटार तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांना आरोग्याच्या
विविध समस्या भेडसावू लागल्या आहेत.
येथील ग्रामपंचायतीद्वारे केल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये प्रामुख्याने गावातील बंदिस्त गटारे, गावांतर्गत सिमेंटचे रस्ते, स्ट्रीट लाइट यांचा समावेश करण्यात आला.
मात्र, सांडपाणी निघून जाण्यासाठी काम झाले नाही. ओढ्यामधील गाळ काढणे, सांडपाणी निचरा करण्यासाठी गांभीर्याने घेतले
नाही.
कुरकुंभ येथील चौक पुणे-सोलापूर व नगर-बारामतीला जोडणारा आहे. रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. त्यामुळे मुख्य चौकात असणाऱ्या या सांडपाण्याचा त्रास प्रवासी; तसेच सामान्य नागरिकांना होत आहे.
सांडपाण्याचे गटार बाजारतळाला अगदीच लागून आहे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा जवळच असल्यामुळे येथेही दुर्गंधीचा त्रास होत आहे.
पावसात या गटारावर असणाऱ्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असते, त्यामुळे वाहतूक खोळंबण्याचा प्रकारदेखील होत असतो. महामार्गाच्या रुंदीकरणात या पुलाची उंची वाढवणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्यामुळे व गटारात जमलेल्या घाणीमुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण होते.
पाटेठाणला गटार योजनेसाठी २ लाख रुपये
पाटेठाण : पाटेठाण येथे दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना कामासाठी सुमारे दोन लाख रुपये निधी मंजूर झाला असून, लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सरपंच आशा मांढरे, ग्रामसेवक संतोष सकट यांनी सांगितले. हे काम गेले काही दिवसांपासून प्रलंबित होते. या कामासाठी दोन लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या मंजूर निधीच्या माध्यमातून दर्जेदार गटारलाईनचे काम करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात सदर गटार योजना व्हावी, यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करत होते. या वेळी सरपंच आशा मांढरे, उपसरपंच पाटील यादव, ग्रामपंचायत सदस्य विजय हंबीर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Kurakumbala gutter causes bad luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.