कोकण किनाकपट्टीला 'क्यार' चक्रीवादळाचा धोका; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 09:24 PM2019-10-25T21:24:34+5:302019-10-25T21:27:12+5:30
कोकणासह गोव्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
मुंबई: अरबी समुद्रात कबी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण आणि गोवा किनारपट्टीला क्यार चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कोकणवासीयांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात क्यार चक्रीवादळ कोकणासह गोव्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनानं
रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कालपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. समुद्रात उंचचउंच लाटा उसळत असल्यानं त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे. अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मालवणमधल्या देवबाग परिसरात परिसरात समुद्राचं पाणी शिरलं आहे.
मुसळधार पाऊस अनेक भागांना झोडपून काढत असताना क्यार चक्रीवादळ धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कोकणवासीयांना त्रास सहन करावा लागू शकतो. क्यार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं स्थानिकांना सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत. गरज असल्यास बाहेर पडा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.