बेरोजगारीला कंटाळून मजुराची आत्महत्या
By admin | Published: August 6, 2015 01:05 AM2015-08-06T01:05:28+5:302015-08-06T01:05:28+5:30
रोजगार मिळत नाही. जे हाती पडते त्यातून घरगाडा चालविणे कठीण झाले. मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भागत नसल्याने नैराश्यातून दादासाहेब
Next
उस्मानाबाद : रोजगार मिळत नाही. जे हाती पडते त्यातून घरगाडा चालविणे कठीण झाले. मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भागत नसल्याने नैराश्यातून दादासाहेब तुकाराम माने या मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहारा तालुक्यातील माकणी येथे बुधवारी पहाटे घडली.
माने हे माकणी येथे पत्नी, दोन मुली व एका मुलासह राहत होते. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी मुलीचा विवाह केला होता. तीन वर्षांपासून तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा तर पाऊसच नसल्याने शेतीतील रोजगाराची कामे ठप्प आहेत. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, या चिंतेतून माने यांनी टोकाचे पाऊल उचलले.