अर्भक आयसीयूमध्ये तज्ज्ञांची कमी

By admin | Published: July 6, 2014 12:49 AM2014-07-06T00:49:11+5:302014-07-06T00:49:11+5:30

दखल घेत उच्च न्यायालयाने या निवासी डॉक्टरांची पदे वाढण्याबाबत येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला दिले आहेत.

Lack of experts in infants ICU | अर्भक आयसीयूमध्ये तज्ज्ञांची कमी

अर्भक आयसीयूमध्ये तज्ज्ञांची कमी

Next

रत्नागिरी : क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरी बसमधून शालेय विद्यार्थिनी फेकली गेल्याची घटना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाजवळ घडली. सुदैवाने विद्यार्थिनी सुरक्षित असली तरी चोवीस तासांकरिता निरीक्षणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालक अविनाश सरोदे हे आपल्या ताब्यातील शहर वाहतुकीची बस (एमएच-१२-युए-९६३८) घेवून आयडीयल हायस्कूल येथून मिरकरवाडाकडे शालेय विद्यार्थी घेऊन जात होते. विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने नववीमधल्या काही मुली दरवाजातून लोंबकळत प्रवास करीत होत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील डॉ. आंबेडकर पुतळ्याला वळसा मारत असताना शाईस्ता इक्बाल दाऊद पेजे ही नववीतील मुलगी गतीमुळे फेकली गेली. तिच्यासोबतच्या अन्य दोन मुलींना वाहक पटेल यांनी पकडल्याने त्या बचावल्या.
शाहिस्ता बसमधून फेकली गेल्याचे पाहून रिक्षा व्यावसायिकांनी आरडाओरड करत बस थांबविण्याचा प्रयत्न केला व शाहिस्ताला उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बसमधील विद्यार्थ्यांनीही ओरड करताच चालक सरोदे यांनी नगर परिषदेजवळ बस थांबवली.
शाहिस्ताला मोठ्या प्रमाणात मुका मार लागला आहे. तिचे पालक रुग्णालयात येईपर्यंत चालक - वाहक रुग्णालयात थांबून होते. बसमधून प्रवास करणाऱ्या मुलांना अनेकदा लोंबकळत प्रवास करावा लागतो, असे तिने सांगितले. चालक सरोदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मागील दरवाजात लटकणाऱ्या मुलांना गाडी सुटण्यापूर्वी बसमधून उतरवून पुढील दाराने चढण्यास सांगितले होते. मात्र गाडी सोडताना काही मुली धावत येऊन पुन्हा दरवाजात लटकत राहिल्या. मुलांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. विद्यार्थी वाहतुकीसाठी एसटीकडून जादा बसेस पुरवल्या जाणे आवश्यक असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lack of experts in infants ICU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.