मालेगाव पंचायत समितीमध्ये माहिती कक्षाचा अभाव

By admin | Published: July 22, 2016 03:53 PM2016-07-22T15:53:35+5:302016-07-22T15:53:35+5:30

पंचायत समितीमध्ये नव्यानेच भाजपा- सेनेची सत्ता आली, त्यातल्या त्यात आता नवीन इमारत सुद्धा प्रशासनाला मिळणार आहे, मात्र पंचायत समितीमधे ज्या विविध योजना

Lack of information cell in Malegaon Panchayat Samiti | मालेगाव पंचायत समितीमध्ये माहिती कक्षाचा अभाव

मालेगाव पंचायत समितीमध्ये माहिती कक्षाचा अभाव

Next

ऑनलाइन लोकमत
मालेगांव, दि. 22 - पंचायत समितीमध्ये नव्यानेच भाजपा- सेनेची सत्ता आली, त्यातल्या त्यात आता नवीन इमारत सुद्धा प्रशासनाला मिळणार आहे, मात्र पंचायत समितीमधे ज्या विविध योजना असतात त्याची माहिती सामान्य नागरिकांना मिळत नसल्याने वारंवार त्याच - त्याच लोकांना त्याचा लाभ दिल्या जात आहे. त्यामुळे विविध योजनानाची माहिती देणा-या माहिती कक्षाचीच स्थापना होणे गरजेचे आहे.
पंचायत समितीच्या ज्या राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जात असून या योजनांची माहिती नागरिकांना मिळत नाही. या योजनांची प्रभावी जनजागृती करण्यासाठी अभाव आहे.त्यामुळे ग्रामीण भागातून येणा-या नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्य कार्यालयात प्रसिद्धी कक्ष नसल्याने गैरसोय होत आहे. पयार्याने या अभावामुळे अनेकांना योजनांपासून वंचित राहावे लागते हे वास्तव आहे.

Web Title: Lack of information cell in Malegaon Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.