लाखो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Published: May 18, 2016 02:01 AM2016-05-18T02:01:39+5:302016-05-18T02:01:39+5:30

नांगरगाव येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

Lack of millions of liters of water | लाखो लिटर पाण्याची नासाडी

लाखो लिटर पाण्याची नासाडी

Next


लोणावळा : नांगरगाव येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या घटनेला २४ तास उलटले, तरी नगर परिषदेकडून जलवाहिनी दुरुस्त न झाल्याने नागरिकांनी संताप व नाराजी व्यक्त केली आहे.
नांगरगावातील मुख्य जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. ती बाब सुजाण नागरिकांनी शेजारीच असलेल्या नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळील कर्मचाऱ्याला जाऊन सांगितली. मात्र, घटनास्थळी जाण्याचे टाळत या कर्मचाऱ्याने आम्हाला वरिष्ठांकडून सांगितले, तर पाहू असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली.
या संदर्भात संबंधित नागरिकांनी नगर परिषदेच्या संकेतस्थळावर तक्रार केली आहे.
राज्यात दुष्काळ असून, पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना अशा प्रकारे पाण्याचे पाट वाहत आहेत. दरम्यान, वाहिनी फुटल्याने परिसरात व रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.

Web Title: Lack of millions of liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.