भंडारा जिल्ह्यात पावसाअभावी तलाव कोरडे

By Admin | Published: June 23, 2016 08:57 PM2016-06-23T20:57:54+5:302016-06-23T21:42:22+5:30

राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे.

Lack of rain in Bhandara district due to rain | भंडारा जिल्ह्यात पावसाअभावी तलाव कोरडे

भंडारा जिल्ह्यात पावसाअभावी तलाव कोरडे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

भंडारा, दि. 23 - राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील १५० गावात जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू असून त्यावर २१ कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला.
भंडारा जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत २०१५-१६ या वर्षात ८६ गावांची निवड करून १,५३७ कामे प्रस्तावित करण्यात आली. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखनी, साकोली व लाखांदूर या सातही तालुक्यात ९०० कामे ६० ते ८० टक्के पूर्ण झाली आहेत. परंतु भंडारा जिल्ह्यात पावसाची सरासरी १३३०.२० मि.मी. आहे. परंतु ईतका पाऊस मागील पाच वर्षात पडला नाही. यावर्षी पावसाने दगा दिला आहे. २३ जूनपर्यंत १५० मि.मी. पावसाची सरासरी असताना यावर्षी केवळ १७.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेले तलाव कोरडे ठण्ण आहेत.

Web Title: Lack of rain in Bhandara district due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.