लोकन्यायालयांमुळे ताण कमी
By admin | Published: June 10, 2016 01:34 AM2016-06-10T01:34:48+5:302016-06-10T01:34:48+5:30
न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोकन्यायालय हे चांगले माध्यम आहे.
मंचर : न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोकन्यायालय हे चांगले माध्यम आहे. न्यायव्यवस्थेवरील वाढत चाललेला ताण कमी करण्यासाठी लोकन्यायालय या संकल्पनेचा उपयोग होईल, असे प्रतिपादन
निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. झेड. एच. काझी यांनी केले.
आंबेगाव तालुका विधी सेवा
प्राधिकरण, घोडेगाव पंचायत
समिती आंबेगाव व घोडेगाव
वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचे आयोजन मंचर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात कण्यात आले.
घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनिल पोखरकर, मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता
गांजाळे, सामाजिक कार्यकर्ते बी. एल. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे, मंचर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन उंडे, ग्रामपंचायत सदस्य अरुण नाना बाणखेले स्वप्निल बेंडे, योगिता बाणखेले, सविता क्षीरसागर, सुप्रिया राजगुरू, बाजीराव मोरडे, तसेच घोडेगाव न्यायालयातील विधिज्ञ अॅड. बाळासाहेब पोखरकर, अॅड. मुकुंद वळसे-पाटील, अॅड. सागर गावडे, अॅड. नीलेश शेळके, अॅड.
संध्या बाणखेले, अॅड. सुदाम मोरडे, अॅड. विनोद चासकर, अॅड. चंद्रकांत पोंदे, तसेच सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कृषी अधिकारी
ऋषीकेश सरगर, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कृषी अधिकारी तोवरे मॅडम तसेच असंख्य पक्षकार उपस्थित होते.
काझी यांचा सत्कार मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केला. घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष अनिल पोखरकर यांनी फिरत्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे मिटविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. अॅड. बाळासाहेब पोखरकर, अॅड. संध्या बाणखेले यांनीही मनोगत व्यक्त केले. अॅड. नीलेश शेळके सूत्रसंचालन यांनी केले. ग्रामसेवक सचिन उंडे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.(वार्ताहर)
समाजात शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव राहण्यासाठी तक्रारी या गावपातळीवरच मिटवल्या पाहिजेत. न्यायालयात असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत.’’- एस.झेड.एच.काझी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश