‘लोकमत’मुळे कर्जतकरांना मिळाले मुबलक पाणी

By admin | Published: May 17, 2016 04:06 AM2016-05-17T04:06:45+5:302016-05-17T04:06:45+5:30

पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला.

Lack of water for the people of Karjat gets enough water | ‘लोकमत’मुळे कर्जतकरांना मिळाले मुबलक पाणी

‘लोकमत’मुळे कर्जतकरांना मिळाले मुबलक पाणी

Next


कर्जत : यंदा लातूरमध्ये भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्जतकरांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला. काही वर्षांपूर्वी कर्जतकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पंधरा वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने कर्जतमध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम राबविला आणि त्यावेळी कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेचा पाठपुरावा करून दहा वर्षांपूर्वी कर्जतकरांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळवून दिले. त्यावेळी हा उपक्रम राबविला नसता तर कर्जतकरांवरही लातूरसारखी परिस्थिती ओढवली असती. कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म पुन्हा राबवावा, अशी मागणी होत आहे.
१९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कर्जतची पेज नदीवरील पाणी योजना शंभर टक्के अनुदानाने मंजूर केली. त्यासाठी १४ कोटी १३ लाख रु पये निधी मंजूर करून योजनेचे काम सुरु करण्यात आले. यासाठी तत्कालीन मंत्री रवींद्र माने, आमदार देवेंद्र साटम, नगराध्यक्ष धनंजय चाचड, नगरसेवक प्रवीण गांगल आणि त्यांच्या टीमने प्रयत्न केले होते. योजनेचे सात टक्के काम झाले असताना १९९९ मध्ये सरकार बदलले आणि त्या आघाडी सरकारच्या धोरणा मुळे पाणी योजना ठप्प झाली. दीड दोन वर्षे झाली तरी योजनेचे काम पुढे जात नव्हते. २१ सप्टेंबर २००१ रोजी ‘लोकमत आपल्या दारी’ हा उपक्र म कर्जतमध्ये आयोजित करण्याचे ठरले. कर्जतच्या २२ वर्षे रखडलेल्या पाणी योजनेला न्याय मिळवून देण्याचा संकल्प त्यावेळी करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. सध्या कोंढाणे धरण प्रकल्प रखडला आहे. त्यातील अडथळे दूर करून तो मार्गी लागल्यास कर्जतकरिता दुसरी पाणी योजना तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आंदोलने सुद्धा झाली परंतु काहीही उपयोग नाही. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्र म आणावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Lack of water for the people of Karjat gets enough water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.