कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:45 PM2024-10-25T16:45:28+5:302024-10-25T16:46:27+5:30

सर्व योजना जनतेच्या आहेत. जे योजना बंद पाडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनता कायमस्वरुपी घरी बसवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Ladaki Bahin Yojana will not be closed, CM Shinde trusts the public | कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास

कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास

आम्ही जी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे, ती कुणीही कितीही काहीही केले तरी बंद होणार नाही. ही योजना वाढतच जाईल आणि त्याचे पैसेही वाढत जातील. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिला आहे. एवढेच नाही तर, आम्ही सुरू केलेल्या कुठल्याही योजना बंद पडणार नाहीत. सर्व योजना जनतेच्या आहेत. जे योजना बंद पाडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनता कायमस्वरुपी घरी बसवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलती आहे -
शिंदे म्हणाले, आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याच वेळी त्यांनी (महाविकास आघाडी) खोडा घातला. ते न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने त्यांना चपराक दिली, हाकलवून लावले. यानंतर ते नागपूरच्या न्यायालयात गेले. काँग्रेसचे वडपल्लीवार गेले आहेत. त्यामुळे लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलती आहे आणि पोटात खुपती आहे. त्यांनी सगळं सांगितलं आहे की, ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या बंद पाडू, चौकशी करू. म्हणून त्यांना जनता साथ देणार नाही. त्यांचे सरकारच येणार नाही. त्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही. लाडक्या बहिणींनी ठरवले आहे की, या लाडक्या भावांना पुन्हा या सरकारमध्ये आणायचे आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे."

फेका-फेक करूनही धनुष्यबान त्यांच्यावर भारी पडला -
"मशाल विरुद्ध धनुष्यबान हा लोकसभेत जिंकलेला आहे. लोकसभा निवडनुकीत आम्ही 13 जागा समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. 40 टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर 47 टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याच बरोबर आम्हाला 2 लाख 60 हजार मते अधिक मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेत एवढी सर्व फेका-फेक करून फेक नरेटिव्ह करूनही धनुष्यबान त्यांच्यावर भारी पडला आहे," असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

आपण मुख्य नेते म्हणून उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहात, या विधानसभेचा स्ट्राइकरेट कसा असेल असे वाटते? यावर बोलताना शिंदे म्हणाले, "मी सांगितले तुम्हाला की, स्ट्राइकरेट जो आहे, लोकसभेत एवढे सर्व फेक नेरेटिव्ह पसरवूनसुद्धा, लोकांना फसवूनही आमचा स्ट्राइकरेट उबाठा पेक्षा अधिक होता. तसेच महायुतीचा स्ट्राइकरेट जो आहे, तो या निवडणुकीत कामाच्या जोरावर, विविध योजनांच्या जोरावर स्ट्राइकरेट एकदम सर्वात भारी असेल आणि सर्वांना चारीमुंड्या चीत करेल. आमचे लोक या निवडणुकीत चौराक आणि षटकार मारतील.


    


 

Web Title: Ladaki Bahin Yojana will not be closed, CM Shinde trusts the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.