साता-याच्या लाडू-चिवडा महोत्सवासाठी तब्बल टनाने लाडू
By admin | Published: October 24, 2016 09:47 PM2016-10-24T21:47:35+5:302016-10-24T21:47:35+5:30
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, त्यामुळे ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाची व्हावी, या हेतूने साता-यात अनेक वर्षांपासून लाडू-चिवडा महोत्सव भरविला जातो.
Next
dir="ltr">
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 24 - दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, त्यामुळे ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाची व्हावी, या हेतूने साता-यात अनेक वर्षांपासून लाडू-चिवडा महोत्सव भरविला जातो. यासाठी शेकडो टन लाडू बनविले जात आहेत. कमी दरात लाडू-चिवडा मिळणार असल्याने गरिबांची दिवाळी गोड होणार हे नक्की. सातारा येथील व्यापारी असोसिएशनतर्फे पोलिस मुख्यालयासमोर लाडू-चिवडा महोत्सव भरविला जातो. या ठिकाणी कमी दरात लाडू-चिवडा उपलब्ध होत असल्याने जिल्ह्याच्या विविध भागांतून त्याला मोठी मागणी असते. शाळा-महाविद्यालयांना अद्याप सुटी लागलेली नाही. अनेक नोकरदारांचा बोनस झालेला नाही. या परिस्थितीत डाळी घरी आणून त्या वाळवून, दळून आणायला आणि लाडू बनवायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे तयार लाडू नेण्यासाठी गृहिणी मोठी पसंती देत असतात. (प्रतिनिधी) आठ दिवसांपासून चार हजार किलो लाडू या ठिकाणी आतापर्यंत सुमारे तीन ते चार हजार किलो लाडू बनविले आहेत. यासाठी पंधरा ते वीस कामगार आठ दिवसांपासून रात्रंदिवस काम करत आहेत. हे लाडू अवघे १२० रुपये किलो दराने विकले जाणार आहेत. कोट : फराळ तयार करणारी आमची ही चौथी पिढी आहे. कृष्णा राऊत यांनी सर्वप्रथम दिवाळीचे फराळ तयार केले. त्यावेळी चिवडा, चकली व लाडूंना मागणी होती. आता विविध दहा पदार्थ तयार केले जात आहेत. - भरत राऊत, मिठाई दुकानदार फोटो आहे... २४सातारा-लाडू दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या सणात घरोघरी करंजी, लाडू, चिवडा, अनारसे असे गोडधोड पदार्थ बनविले जातात. मात्र, अनेक नोकरदार गृहिणींना हे पदार्थ घरी बनविणे शक्य होत नाही. साताºयातील बाजारपेठेत दिवाळीची गोडी वाढविणाºया लाडवांना प्रचंड मागणी असून, व्यापारी असोसिएशनच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाडू बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. (छाया : जावेद खान)