महिला कार रॅली ठरली लक्षवेधी

By Admin | Published: March 7, 2017 02:05 AM2017-03-07T02:05:59+5:302017-03-07T02:05:59+5:30

महिला सबलीकरणाचा संदेश देत मुंबईत रविवारी अनोखी महिला कार रॅली पार पडली.

Ladies car rally marked attention | महिला कार रॅली ठरली लक्षवेधी

महिला कार रॅली ठरली लक्षवेधी

googlenewsNext


मुंबई : महिला सबलीकरणाचा संदेश देत मुंबईत रविवारी अनोखी महिला कार रॅली पार पडली. अंधेरी ते अ‍ॅम्बी व्हॅलीपर्यंत काढण्यात आलेल्या या विशेष रॅलीचे आयोजन ८ मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनानिमित्त करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मुंबईतील १८ ते ७५ वर्षांपर्यंतच्या हौशी महिला ड्रायव्हर्सनी सहभाग घेत समाजामध्ये महिला सबलीकरणाचा संदेश दिला.
वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाइल असोसिएशनच्या (डब्ल्यूआयएए) वतीने झालेल्या या रॅलीला मुंबई विमानतळाजवळील एका नामांकित हॉटेलपासून सकाळी ७ च्या सुमारास सुरुवात झाली. या वेळी रॅलीत सुमारे ८०० कार सहभागी झाल्या होत्या आणि प्रत्येक कार विशेषरीत्या सजविण्यात आल्याने महिला कार रॅलीने मुंबईकरांचे लक्ष वेधले. या वेळी रॅलीच्या मार्गक्रमणात नागरिकांमध्ये या रॅलीची क्षणचित्रे आपल्या मोबाइलमध्ये घेण्यासाठी मोठी चढाओढ लागली.
वरळी सी-फेस, पेडर रोड, चौपाटी, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट अशा मार्गाने गेलेली ही रॅली लोणावळा अ‍ॅम्बी व्हॅली येथे समाप्त झाली.
सोशल मीडियावर अनेकदा महिला चालकांवर विनोद तयार करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते. परंतु, महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून, ड्रायव्हिंगसारख्या पुरुषी क्षेत्रातही आम्ही आमचे वेगळे स्थान निर्माण करू शकतो,
असा संदेश देत मुंबईतील महिलांनी हा उपक्रम यशस्वी केला.
(प्रतिनिधी)

Web Title: Ladies car rally marked attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.