'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 10:47 AM2024-11-02T10:47:40+5:302024-11-02T10:48:26+5:30

Ladki Bahin Yojana : CM शिंदेंकडून लाडक्या बहिणींसाठी पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी...!

Ladki Bahin Yojana When will you get the money for December month of 'Ladki Bahin' Yojana? The CM Eknath shinde gave good news | 'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!

'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा कुठल्या योजनेची सुरू असेल तर, ती आहे 'लाडकी बहीण' योजना. ही योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. तर आता चर्चा सुरू आहे ती डिसेंबर महिन्याच्या पैशांची. यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिली आहे...! या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार, यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्र्यांनी गुडन्यूज दिली आहे. एवढेच नाही, तर लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचे आपले स्वप्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

'लाडकी बहीण' योजनेच्या डिसेंबर महिन्यांच्या पैशांसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "लाडकी बहीण योजनेचे पैसे कोड ऑफ कंडक्टमध्ये अडकू नयेत, म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यातच देऊन टाकले. मी अता आपल्याला सांगतो की, 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे. 23 नोव्हेंबरला निकाल आहे. यानंतर, याच नोव्हेंबरमध्ये आम्ही डिसेंबरचे पैसे देणार. कारण आमचा हेतू स्पष्ट आहेत. आम्ही देणारे लोक आहोत घेणार नाही."

"लाडक्या बहिणी यांना माफ करणार नाहीत. या अडथळे निर्माण करणाऱ्यांना त्या नक्कीच जोडे दाखवतील आणि या सावत्र भावांपासून त्या निश्चितपणे सजग आहेत." एवढेच नाही तर, "आम्ही केवळ 1500 रुपयांवर थांबणार नाही, आशिर्वाद मिळाला तर आम्ही ते आणखी वाढवू. माझ्या बहिणींना लखपती बनवण्याचे आमचे स्वप्न आहे," असेही शिंदे यांनी म्हटले आहे. ते एएनआय या वृत्त संस्थेशी बोलत होते.

Web Title: Ladki Bahin Yojana When will you get the money for December month of 'Ladki Bahin' Yojana? The CM Eknath shinde gave good news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.