तलाव, मंदिर, स्मशान होणार सर्वांसाठी खुले : 'RSS'च्या बैठकीत येणार प्रस्ताव

By admin | Published: March 12, 2015 07:02 PM2015-03-12T19:02:33+5:302015-03-12T19:02:33+5:30

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या (आरएसएस )बैठकीला उद्यापासून नागपुरात सुरुवात होणार असून या बैठकीत तलाव, मंदिर, स्मशान सर्वांसाठी खुले करण्यावर प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत.

Lakes, temples, cremation grounds will be open to all: The proposal that will come in the RSS meeting | तलाव, मंदिर, स्मशान होणार सर्वांसाठी खुले : 'RSS'च्या बैठकीत येणार प्रस्ताव

तलाव, मंदिर, स्मशान होणार सर्वांसाठी खुले : 'RSS'च्या बैठकीत येणार प्रस्ताव

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या (आरएसएस )बैठकीला उद्यापासून नागपुरात सुरुवात होणार असून या बैठकीत तलाव, मंदिर, स्मशान सर्वांसाठी खुले असावे यासाठी  प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत.
सार्वजनिक तलाव, मंदिर आणि स्मशान हे तीन ठिकाण सर्वांसाठी खुले करण्यात यावे यावर कोणत्याही प्रकारे बंदी घालण्यात येवू नये यासाठी राष्ट्रीय स्वंय सेवक संघाच्या उद्या होत असलेल्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. देशातील सार्वजनिक ठिकाणी तलावावर पाणी भरताना उच्चवर्णीयांकडून मागासवर्गीयांना अनेक वेळा अडवले जाते तसेच मंदिर प्रवेश करताना अटकाव केला जातो. परंतू या तीनही ठिकाणी सर्वधर्मिंयांना अटकाव केला जावू नये तसेच हे ठिकाण सर्वांसाठी खुले असावे यासाठी बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास अनेक खेडोपाडी याचा मागासवर्गीय लोकांना फायदा होण्यास मदत होईल तसेच पाणी भरण्यावरुन, मंदिर प्रवेशावरुन होणारी हाणामारी रोखण्यात मदत मिळणार आहे. तलाव, मंदिर व स्मशान या ठिकाणी सर्वधर्मिंयांना जाण्यास मुभा असावी असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसापूर्वी भाषणात म्हटले होते. त्यामुळेच हा प्रस्ताव येणार असून त्यावर चर्चा होणार आहे. तसेच या प्रस्तावासह अन्य प्रस्तावही येणार आहेत. यामध्ये यूएएनने २१ जून योग दिवस म्हणून घोषित केला आहे. त्याचा प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने प्रस्ताव ठेवण्यात येईल, इंग्रजीचं दडपण वाढत असल्याने प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच व्हावे यासाठी दुसरा प्रस्ताव मांडण्यात येणार अशी माहिती आखिल भारतीय प्रचार प्रमूख डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली. देशात संघाच्या शाखेत १८ टक्क्याने वाढ झाली असून २०१२ मध्ये ४८ हजार शाखा होत्या त्या आता ५४ हजारांवर पोहोचल्या असल्याची माहिती वैद्य यांनी दिली. या बैठकीत सरकार्पयवाहक पदाची निवडही करण्यात येणार असल्याचे वैद्य म्हणाले.

Web Title: Lakes, temples, cremation grounds will be open to all: The proposal that will come in the RSS meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.