राज्यात २५४ शहरांमध्ये लखलखाट
By admin | Published: October 21, 2015 03:50 AM2015-10-21T03:50:04+5:302015-10-21T03:50:04+5:30
केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत राज्याच्या २५४ शहरांतील वीज यंत्रणांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत राज्याच्या २५४ शहरांतील वीज यंत्रणांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्याला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातून महावितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या आधुनिकीकरणामुळे वीजहानी व वाणिज्यिकहानी कमी होईल. शहरी भागांसोबत ग्रामीण भागांतील ग्राहकांना आठवड्याचे सातही दिवस २४ तास वीज मिळावी, यासाठी वीजयंत्रणा सक्षम करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी शहरांचा यात समावेश आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर, पन्हाळा, पेठवडगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, कोल्हापूर, कागल, मुरगूड, गडहिंग्लज तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टाचा समावेश आहे.(प्रतिनिधी)
असे होणार आधुनिकीकरण
पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये या योजनेतून कामे.
३३ केव्हीची १२८ नवीन उपकेंदे्र
६० उपकेंद्रांची क्षमता वाढ
तीन हजार ७७८ किलोमीटर उच्चदाब व तीन हजार १५१ किलोमीटर लघुदाब वाहिन्या
नवीन ६०६० वितरण रोहीत्र
योजना राबविण्यासाठी राज्याला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातूनच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.