'लालबाग राजा' मंडळाच्या कार्यकर्त्याने पोलिस अधिका-याला अडवले
By admin | Published: September 6, 2016 10:44 AM2016-09-06T10:44:17+5:302016-09-06T11:52:50+5:30
लालबागमधील प्रसिध्द 'लालाबागचा राजा' गणेशोत्सव मंडळ पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - लालबागमधील प्रसिध्द 'लालाबागचा राजा' गणेशोत्सव मंडळ पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे. लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्त्यावर ऑनडयुटी पोलिस अधिका-याबरोबर गैरवतर्णूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोसायटी गेटमधून आत जाण्यापासून पोलिस अधिका-याला रोखण्यात आले. त्यावरुन वादाची ठिणगी पडली. एपीआय दर्जाच्या या अधिका-याला धक्काबुक्की करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. कलम ३५३ आणि ३३२ अंतर्गत या कार्यकर्त्याविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागच्या काहीवर्षांमध्ये लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोधात अनेक तक्रारी झाल्या आहेत. मागच्यावर्षी महिला पोलिसाला झालेली मारहाण, महिला भाविकाशी असभ्य वर्तन असे अनेक आरोप या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर झाले आहेत.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसात दरवर्षी या ठिकाणी वादाच्या घटना घडतात. दर्शनासाठी ओळखीच्या भाविकांना आत सोडण्यावरुन दरवर्षी इथे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीच्या अनेक घटना घडतात. गणेशोत्सवात इथे प्रचंड गर्दी असते त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना आणि त्यांच्या गाडयांसाठी विशेष पास दिले जातात. त्यावरुनही वाद होतात.