ललिता पंचमीला अंबाबाई गजारूढ

By admin | Published: September 30, 2014 02:22 AM2014-09-30T02:22:17+5:302014-09-30T02:22:17+5:30

करवीरनिवासिनी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केल्यानंतर साजरा झालेल्या विजयोत्सवात तिची प्रिय सखी देवी त्र्यंबोलीचे मात्र विस्मरण होते.

Lalita Panchmila Ambabai Ganjarudh | ललिता पंचमीला अंबाबाई गजारूढ

ललिता पंचमीला अंबाबाई गजारूढ

Next
>दोन जिवलग सखींची भेट : शारदीय नवरात्रौत्सवाची पाचवी माळ 
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केल्यानंतर साजरा झालेल्या विजयोत्सवात तिची प्रिय सखी देवी त्र्यंबोलीचे मात्र विस्मरण होते. तिचा रुसवा काढण्यासाठी स्वत: अंबाबाई आपल्या शाही लवाजम्यानिशी तिच्या भेटीला जाते. दोन जिवलग सखींची भेट आणि कोहळा भेदण्याचा विधी सोमवारी ललिता पंचमीला संपन्न झाला. यानिमित्त शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.
पाचव्या माळेला अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. अंबाबाईने कोल्हासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले. त्या कार्यात तिला सखी त्र्यंबोली देवीनेही कामाक्षाचा वध करून सहकार्य केले. मात्र, अंबाबाईच्या विजयोत्सवात त्र्यंबोलीला बोलावणो राहून जाते. त्यामुळे त्र्यंबोलीदेवी अंबाबाईवर रुसून तिच्याकडे पाठ करून बसते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या शाही लवाजम्यानिशी त्र्यंबोलीचा रुसवा काढण्यासाठी जाते. या वेळी देवी त्र्यंबोली, ‘तू कोल्हासुराचा वध कसा केलास, ते मला दाखव,’ अशी इच्छा व्यक्त करते. त्यानुसार अंबाबाई कोल्हासुराचे प्रतीक म्हणून कोहळ्याचा भेद करून त्याचा वध कसा केला ते दाखविते. या कथा भागानुसार दरवर्षी ललिता पंचमीला अंबाबाईची पालखी त्र्यंबोलीच्या भेटीला जाते व तेथे कोहळा भेद हा विधी होतो.  (प्रतिनिधी)  
 
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला सोमवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.
 
त्र्यंबोलीच्या भेटीला गजारूढ होऊन अंबाबाई जाते म्हणून या दिवशी ही पूजा बांधली जाते.

Web Title: Lalita Panchmila Ambabai Ganjarudh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.