लालूप्रसाद यादव अतिदक्षता विभागाबाहेर
By admin | Published: September 4, 2014 02:32 AM2014-09-04T02:32:47+5:302014-09-04T02:32:47+5:30
ओपन हार्ट सजर्री झाल्यावर सात दिवसांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले आहे.
Next
मुंबई : ओपन हार्ट सजर्री झाल्यावर सात दिवसांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले आहे. त्यांच्यावर 27 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
लालूप्रसाद यादव यांना 24 ऑगस्टच्या रात्री अंधेरीच्या एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून कृत्रिम झडप बसवण्यात आली. यानंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते. या सात दिवसांमध्ये त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे बुधवारी संध्याकाळी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या दिवसांमध्ये त्यांची प्रकृती स्थिर होती. लालूप्रसाद यादव आता चालू लागले आहेत. त्यांना काही नियमित व्यायाम देण्यात आला आहे, तो ही त्यांनी सुरू केला आहे. (प्रतिनिधी)