राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलकांवर लाठीमार

By Admin | Published: January 7, 2015 10:03 PM2015-01-07T22:03:51+5:302015-01-08T00:01:02+5:30

नारायण राणे : आरोंदा जेटीप्रकरणी आरोप

Lamenting the protesters by the Minister of State | राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलकांवर लाठीमार

राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलकांवर लाठीमार

googlenewsNext

कुडाळ : ज्या लोकांनी मते दिली, त्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचे काम येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून झाले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीप्रकरणी कुडाळ येथे आज, बुधवारी पत्रकार परिषदेत नाव न घेता मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला.आरोंदा येथील आंदोलनकर्ते ग्रामस्थ, महिला यांच्यावर दगडफेक करून त्यांना रक्तबंबाळ करणाऱ्या कंपनीच्या लोकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसून, जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडणार, असा इशाराही राणे यांनी दिला. जेटी बांधत असताना जर येथील गणपती विसर्जनाचा, येण्या-जाण्याचा मार्ग बंद होत असेल, स्थानिक मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असेल, राज्य रस्ता बंद करण्यात येत असेल, येथील बोटी नेण्याकरिता पाण्यातील खडक फोडल्याने पुराची स्थिती भविष्यात उद्भवत असेल, तर जनतेने छेडलेले आंदोलन योग्य आहे. त्यामुळे आपण जनतेच्या पाठीशी आहोत. ग्रामस्थ व महिलांवर कंपनीकडून दगडफेक करून जर जेटी सुरू होणार असे वाटत असेल, तर आम्ही तसे कदापी होऊ देणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना कलमात खाडाखोड करून अटक करण्यात आली व हे येथील राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे. मते देणाऱ्याच लोकांना रक्तबंबाळ करण्याचेही काम त्यांच्या सांगण्यावरून झाले आहे. याबाबतीत ग्रामस्थांच्या विरोधात व आडमार्गाने प्रशासन काम करीत असेल, तर अधिकाऱ्यांना कायद्याची ओळख दाखविण्याचेही काम करेन, असेही सांगितले.
अधिकृत रस्ता बंद करणे हा कायद्याने गुन्हा असून, येथील अधिकृत रस्ता करण्यासाठी आम्हाला शासनाची परवानगी काढायची गरज नसून, आम्ही तो रस्ता सुरू करू शकतो. आरोंदा येथील रस्ता सुरू केला नाही तसेच कंपनीच्या लोकांवर कारवाई केली नाही, तर तीव्रतेचे आंदोलन करू, असा इशारा राणेंनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Lamenting the protesters by the Minister of State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.