‘भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात देशभर दौरा’
By admin | Published: August 28, 2015 01:00 AM2015-08-28T01:00:11+5:302015-08-28T01:00:11+5:30
भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध व सैनिकांसाठी ‘वन रँक वन पेन्शन’ या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहे.
सोलापूर : भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध व सैनिकांसाठी ‘वन रँक वन पेन्शन’ या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहे. आंदोलनास समर्थन मिळविण्यासाठी सप्टेंबर महिन्यात देशभर दौरा करणार असून हा कायदा रद्द करेपर्यंत मी गप्प बसणार नाही, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी दिला. पाणीटंचाई लक्षात घेऊन छावण्या उघडण्यास अडचण वाटत असेल तर टंचाईक्षेत्रात चारा डेपो उघडण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहिले आहे. प्रशासनाने कर्तव्यास विलंब न करता लोकांना दिलासा देणारी कृती करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
उजनीत पाणी सोडा : वरच्या धरणातून उजनीमध्ये २0 टीएमसी पाणी सोडावे, असा आग्रह मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे धरणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिली. भीमा नदीकाठची पिके वाळून चालली आहेत. त्यामुळे भीमेत पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी आमची ठाम मागणी आहे, असे ते म्हणाले.