रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन
By admin | Published: August 5, 2015 01:06 AM2015-08-05T01:06:53+5:302015-08-05T01:06:53+5:30
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने भूसंपादनासाठी अधिसूचना काढली आहे.
दोन तालुक्यांतील भूमी संपादनाची जबाबदारी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गास मिरजेपासून बोलवाड, टाकळी, मालगाव, तानंग हद्दीतून बायपास मार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी सुमारे चारशे हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. मालगाव, टाकळी, बोलवाड परिसरात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. त्यामुळे प्रस्तावित बायपास मार्गास शेतकऱ्यांचा विरोध आहे. (प्रतिनिधी)