अल्पभुधारकांच्या जमिनी सिंचनाखाली !

By admin | Published: November 13, 2015 02:12 AM2015-11-13T02:12:47+5:302015-11-13T02:12:47+5:30

सिंचन कामांवर रोहयोचा भर; राज्यात ७९ हजार विहिरींची कामे प्रगतीपथावर.

Land of the landowners under irrigation! | अल्पभुधारकांच्या जमिनी सिंचनाखाली !

अल्पभुधारकांच्या जमिनी सिंचनाखाली !

Next

ब्रम्हानंद जाधव/मेहकर/(जि.बुलडाणा): राज्यात सन २0१४-१५ मध्ये रोहयोतून २0 हजार ४११ विहिरींची कामे पूर्ण झाली आली असून, ७९ हजार १३८ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. याममुळे राज्यातील हजारो अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या जमीनी सिंचनाखाली आल्या आहेत. जवाहर विहीर कार्यक्रम राज्य रोहयोंतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ च्या कलम १२ (ई) अन्वये राज्यात सन १९९९ पासून हाती घेण्यात आला आहे. राज्यातील ओलितीचे क्षेत्र वाढवून शेतकर्‍यांना बळकटी देण्यासाठी तसेच दुष्काळसदृश्य परिस्थीतीवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे व जिरविणे त्याचबरोबर पाण्याचा उपसा करून सिंचन करणे आदी कामांवर रोजगार हमी योजनेतून भर दिला जात आहे. राज्यात सन २0१४-१५ मध्ये २0 हजार ४११ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत. तर ७९ हजार १३८ कामे चालू आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात ४५ विहिरींची कामे पूर्ण व २६ हजार ६ विहिरींची कामे चालू आहेत. विदर्भातील १५३४ विहिरींची कामे अपूर्ण! विदभार्तील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी २00६ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना एक लाखापर्यंत अनुदान दिले जात होते. २३ जानेवारी २0१४ च्या शासन निर्णयानुसार धडक सिंचन विहीर योजनेतील अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थिीती रोहयोच्या धडक सिंचन विहीर या योजनेंतर्गत विदर्भातील सहा जिल्ह्यात ३५ हजार ९८५ विहीरी पूर्ण झाल्या असून, एक हजार ५३४ विहिरींची कामे अद्यापही अपूर्णच आहेत. ह्या अपूर्ण विहिरी ३0 जून २0१६ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत.

Web Title: Land of the landowners under irrigation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.