दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरा
By admin | Published: July 6, 2014 02:34 AM2014-07-06T02:34:23+5:302014-07-06T02:34:23+5:30
आदेशाची वाट न पाहता आंदोलन करावे, असे स्पष्ट आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात दिले.
Next
ठाणो : केंद्र सरकारने यापुढे कोणत्याही प्रकारची दरवाढ केल्यास कार्यकत्र्यानी कोणत्याही आदेशाची वाट न पाहता आंदोलन करावे, असे स्पष्ट आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात दिले. भाजपाचेच लोक आता ‘अच्छे दिन आयेंगे’ असे म्हणत होते. पण महागाई कमी करू असे कुठेच बोललो नव्हतो, असे आता सांगत आहेत. त्यावरून त्यांची सत्यता काय ते दिसत असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात झालेल्या या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. जे लोक पक्षात काहीच काम करीत नाहीत त्यांना पदावरून हटवा, असा सल्लाही पवार यांनी तटकरेंना दिला. तटकरे म्हणाले, सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी सरकारी योजना जनतेर्पयत पोचवल्या पाहिजेत.