सावंतवाडीतील असनिये येथे डोंगर खचला; घारपी गावाचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 06:37 PM2019-08-08T18:37:22+5:302019-08-08T18:37:53+5:30
गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने ओटवणे पचक्रोंशीत हाहाकार माजवला असून, असनियेतील मोठा डोंगरच खाली आला.
सावंतवाडी - गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने ओटवणे पचक्रोंशीत हाहाकार माजवला असून, असनियेतील मोठा डोंगरच खालती आला असून, यामुळे घारपीकडचा संपर्क तुटला आहे. तर या डोंगराच्या खाली असलेली पाच घरे थोडक्यात बचावली असून, माती मात्र त्यांच्या घरात घुसली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, डोंगर खालती आला त्यावेळी मोठा आवाज झाल्याचे गावक-यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाउस कोसळत आहे. या पावसामुळे ओटवणे पंचक्रोशीत सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, नदी नाले तुडूंब भरून वाहात आहेत. त्यातच असनिये दाभील कडे जाणारा रस्ता खचून मोठे नुकसान झाले आहे.अनेक गावामध्ये दुचाकी वगळता मोठी वाहने जात नाहीत.अशातच असनिये घारपीला जोडणाºया रस्त्याला लागून एक मोठा डोंगर आहे. या डोंगराची माती मंगळवारपासून खालती येत होती. गावकरी परिस्थीतीवर लक्ष ठेवून असतनाच बुधवारी रात्रीच्या सुमारास तर पूर्णच डोंगर खाली आला.
डोगरच खाली आल्याने असनिये घारपी रस्ता पूर्णपणे गाडला गेला असून, विद्युत पोलही या डोंगरातील मातीच्या खाली अडकून पडले आहेत. तसेच तब्बल शंभर ते दिडशे काजूंची झाडे नारळ मोठ मोठी झाडेही डोंगराच्या माती खाली आहेत. या डोंगराच्या खाली पाच घरे असून, ही घरे मात्र सध्यातरी सुरक्षित आहेत. पण त्यांच्या अंगणात पाण्याबरोबर मातीही आली आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. असनियेतून घारपीला जाण्यासाठी रस्ता आता पूर्णता गाडला गेल्याने घारपी गाव संर्पकहिन झाला आहे. घटनेनंतर प्रशासनाचे अधिकारी गुरूवारी सायंकाळी गावात पोचले असून, यात नायब तहसलिदार सुरेश पवार यांच्यासह अधिकाºयांचा समावेश आहे. त्यांनी घटनेची पाहणी केली आहे.
असनिये गावात गेले पाच ते सहा दिवस विज नाही. तर घारपी गाव सर्व दृष्ट्या आता अडचणीत सापडला असून, गावात संपर्क करण्यासाठी कोणतेच साधन नाही. जर त्यान्ाां घारपीतून असनियेत यायचे झाले तर पायवाट शोधत यावे लागणार आहे. तर आता हा रस्ता नव्याने करणेही शक्य नसल्याचे दिसून येत आहे.