मुसळधार पावसामुळे कार्ला येथे भूस्खलन
By admin | Published: August 10, 2014 01:48 AM2014-08-10T01:48:50+5:302014-08-10T01:48:50+5:30
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणावळा कार्ला येथील o्री एकवीरा देवीच्या गडावर आणि कार्ला लेणी परिसरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे जमीन खचली आहे.
Next
>ठाणो : महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणावळा कार्ला येथील o्री एकवीरा देवीच्या गडावर आणि कार्ला लेणी परिसरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे जमीन खचली आहे. तसेच संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळे o्री एकवीरा देवीच्या दर्शनाला येणा:या भाविक व पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे भूस्खलन व संरक्षण भिंतीची दुरुस्ती युद्धपातळीवर करावी, अशी मागणी o्री एकवीरा देवस्थान ट्रस्टने केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे महाराष्ट्र आणि गोवा विभागप्रमुख जितेंद्रनाथ यांच्याकडे केली आहे.
गडावर जाताना पाच पाय:यांजवळ वाहनांच्या पार्किगची व्यवस्था असलेल्या ठिकाणी घरे व दुकाने आहेत. त्याच ठिकाणी गडावरील संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळे व जमीन खचल्यामुळे संरक्षण भिंत कोसळण्याची भीती आहे.
ही भिंत जर कोसळली तर पुण्याच्या माळीण गावासारखी मोठी दुर्घटना होऊन मोठी वित्त व मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने संरक्षण कडय़ाचा व खचलेल्या जमिनीचा सव्र्हे करून दुरुस्ती करावी, अशी मागणीही o्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी पुरातत्त्व विभागाकडे केली आहे.
तरे यांच्यासह शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, o्रीरंग बारणो यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वीच जितेंद्रनाथ यांची भेट घेऊन पावसाळ्यात भूस्खलनामुळे जमीन खचू नये म्हणून स्टोन पिचिंग किंवा सिमेंटचा कोबा करण्याची तसेच संरक्षण भिंतींना गेलेले तडे दुरुस्त करण्याची मागणी केली होती.
विश्वस्तांनी केली पाहणी..
अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे गडावर भूस्खलनामुळे जमीन खचली आणि संरक्षण भिंतींना तडे गेल्याची माहिती मिळताच ट्रस्टचे अध्यक्ष तरे यांच्यासह उपाध्यक्ष मदन भोई, सेक्रेटरी संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, सहखजिनदार विलास कुटे, काळुराम देशमुख, विश्वस्त पार्वती पडवळ, विजय देशमुख, भानुदास म्हात्रे, विलास राऊत, सुनील माळी आदींनी पाहणी केली. (प्रतिनिधी)