हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 46 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:29 AM2017-08-14T06:29:33+5:302017-08-14T07:02:48+5:30

दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला.

 Landslide in Himachal Pradesh: Many houses were buried under two stairs along with two buses | हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 46 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 46 जणांचा मृत्यू

Next

शिमला : ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात हिमाचल प्रदेशमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरून जाणा-या राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला. रात्री उशीरापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू होते. बेपत्ता असलेल्यांची संख्या मोठी असल्याने मृतांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल वेदना झाल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले.
दरडी कोसळल्या व त्यामुळे मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग १५४ च्या कोत्रुपी खेड्यातील १०० मीटर भागाची हानी झाली. या महामार्गावरून एक बस मनाली येथून कटरा तर दुसरी चांभा येथून मनालीला निघाली होती. या दोन्ही बस हिमाचल प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या होत्या. दरडी कोसळल्यामुळे रस्ता वाहून गेला व त्यामुळे बसगाड्या ८०० मीटर खोल दरीत कोसळल्या. एक बस तर दरडीखाली पूर्णपणे गाडली गेल्यामुळे तिचा रात्री उशीरापर्यंत शोध लागला नव्हता. या बसमध्ये तब्बल ५० प्रवासी होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी अधिकाºयांसह घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले की, सर्वांना बाहेर काढेपर्यंत मदतकार्य सुरू राहील. पाच जखमींना मंडी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. (वृत्तसंस्था)
।मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख
मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आरोग्यमंत्री कौल सिंग ठाकूर, परिवहन मंत्री जीएस बाली आणि ग्रामविकास मंत्री अनिल शर्मा यांनीही घटनास्थळी भेट दिली. आरोग्यमंत्री ठाकूर यांनी मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर परिवहन मंत्र्यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
>४५ मृतदेह बाहेर काढण्यात यश
रात्री उशिरापर्यंत मनालीकडे जाणाºया बसमधून ४२ तर कटराकडे जाणाºया बसमधून तीन मृतदेह असे ४५ मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. त्यापैकी २३ मृतदेहांची ओळख पटली आहे. त्यात सनी कुमार या बाइकरचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.
>250
मीटरचा संपूर्ण परिसर मलब्याखाली गाडला गेला असून, त्यात दोन वाहने आणि अनेक घरे अडकली आहेत. त्यात अनेक जण गाडले गेले असण्याची भीती आहे. महामार्ग बंद करण्यात आला आहे.

Web Title:  Landslide in Himachal Pradesh: Many houses were buried under two stairs along with two buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.