करमळी बोगद्यात माती कोसळली,कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:50 AM2021-07-19T11:50:45+5:302021-07-19T11:52:18+5:30
Flood Goa Konkanrailway Sindhudurg : गोव्यातील करमळी येथील बोगद्यात माती कोसळत असल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघड झाला.ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ठळक मुद्देकरमळी बोगद्यात माती कोसळलीकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
सिंधुदुर्ग : गोव्यातील करमळी येथील बोगद्यात माती कोसळत असल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघड झाला.
ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे करमळी बोगद्यात माती कोसळल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे,असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.