प्रत्येक शाळेत भाषा प्रयोगशाळा
By Admin | Published: September 6, 2014 02:26 AM2014-09-06T02:26:37+5:302014-09-06T02:26:37+5:30
शिक्षण विभाग राबवीत असलेल्या अनेक उपक्रमांमुळे राज्यात शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढला आहे. त्यामध्ये आणखी सुधारणा करून देशातच नव्हे तर जगाशी स्पर्धा करणारी पिढी आपल्याला घडवायची आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांची ग्वाही : राज्य शिक्षक पुरस्कारांचे वितरण
पुणो : शिक्षण विभाग राबवीत असलेल्या अनेक उपक्रमांमुळे राज्यात शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढला आहे. त्यामध्ये आणखी सुधारणा करून देशातच नव्हे तर जगाशी स्पर्धा करणारी पिढी आपल्याला घडवायची आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित शिक्षण यंत्रणा निर्माण करण्याबरोबरच भाषा प्रयोगशाळा उभी केली जाईल. जागितक दर्जाचे मुख्याध्यापक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचाही राज्य सरकारचा मानस आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.
शिक्षक दिनानिमित्त राज्य सरकारतर्फे शुक्रवारी येथे राज्य शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाले. (प्रतिनिधी)
‘शिक्षणच एक जादुची कांडी’
च्राज्यातील 37 प्राथमिक, 38 माध्यमिक, आदिवासी विभागातील 18 प्राथमिक, 2 विशेष शिक्षक, अपंग विद्याथ्र्याच्या शाळेतील एक शिक्षक, 2 स्काउट गाइड तसेच 8 शिक्षिकांना समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले.
च्मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक मुलाला सहजगत्या शिक्षण मिळण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पायाभुत सुविधा वाढविण्यावरही भर दिला जात आहे. देशात राज्याची अर्थव्यवस्था प्रथमस्थानी असताना याबाबतीतहीआपण पहिल्या क्रमांकावर यायला हवे. सरकार व शिक्षकांनी एकमेकांना पूरक काम केले तर हे शक्य होईल.
च्समाजाकडून शिक्षकांच्या खूप अपेक्षा असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संस्कारी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांना करायचे आहे. राज्य सरकार सर्वात जास्त निधी या विभागाला देत असले तरी तो आवश्यकच आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या, राज्य व देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षणच एक जादुची कांडी आहे. समाजनिर्मिती हा आपला धर्म मानून शिक्षकांनी विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी पेलायला हवी.
पुरस्कारार्थीना टॅब्लेट पीसी : पुरस्कारांर्थी शिक्षिकांना यावर्षी टॅब्लेट पीसी देण्यात आले. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.